रायगड- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे, हा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे. कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न, भीती आहे. जिल्ह्याची कोरोना विषाणूबाबत काय परिस्थिती आहे, याची माहिती जनतेला व्हावी यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीप हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रायगडकरांशी संवाद साधणार आहेत.
23 एप्रिलला सकाळी 11 वाजता या माध्यमातून नागरिक आपले प्रश्न, शंका अधिकाऱ्यांसमोर मांडू शकणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या दरम्यान रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, प्रादूर्भाव रोखणे, नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केल्या आहेत.