रायगड- मुंबईहुन माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या महिलेचा आठशे फुट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. गीता मिश्रा असे या मृत महिलेचे नाव असून त्या दिवा येथील रहिवाशी होत्या. माथेरानमधील बेलविडीयर पॉईंट येथे ही महिला गेली असता, एका लहान दगडाला ठेच लागून तिचा तोल गेला आणि ती ८०० फूट खोल दरीत कोसळली.
माथेरानमध्ये ८०० फुट खोल दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू
ही महिला पती, दोन लहान मुली आणि एक मित्र यांच्यासोबत शनिवारी सकाळी माथेरान फिरण्यासाठी आली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ही महिला पती, दोन लहान मुली आणि एक मित्र यांच्यासोबत शनिवारी सकाळी माथेरान फिरण्यासाठी आली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरून तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पर्यटक महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी पर्यटनास येताना परिसराची माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच पॉईंटवर फिरताना स्वतःची काळजी घेणे अति महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना टाळणे शक्य होईल.