रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यात बुधवारी एक वीस वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. शेलटोली या गावात राहणारा हा तरुण महाड एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामगार म्हणून काम करीत होता. या तरुणाला केईएम रुग्णालयात दाखल केले असून त्याची स्थिती नाजूक आहे.
महाडमध्ये आढळला एक कोरोना पॉझिटिव्ह, शेलटोली परिसर केला बंद - रायगड कोरोना स्थिती
महाड तालुक्याच्या शेलटोली गावात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने हा परिसर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून पूर्ण परिसर बंद केला आहे.
महाडमध्ये आढळला एक कोरोना पॉझिटिव्ह, शेलटोली परिसर केला बंद
महाडच्या तालुक्याच्या शेलटोली गावात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने हा परिसर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून पूर्ण परिसर बंद केला आहे. या तरुणाच्या संपर्कात 15 जण आले आहेत. त्याना बिरवाडी ते मुंबई असा प्रवास केला होता. आठ दिवसांपूर्वी महाड शहरात एक महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर, बुधवारी मिळालेल्या पॉझिटिव्ह बाधितांमुळे महाड तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात सध्या 105 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.