रायगड -अलिबाग तालुक्यातील परहूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तलवडे गावातील 39 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मुंबई पोलीस दलातीस धारावी पोलीस ठाण्यात हा तरुण कार्यरत होता. त्यामुळे अलिबागमध्ये कोरोनाने शिरकाव केला. हा तरुण पॉझिटिव्ह असल्याचे आरोग्य सेतू या शासनाच्या अॅपद्वारे कळण्यात आल्याने प्रशासनाला संपर्क केल्यानंतर या बाधितांचा शोध लागला.
अलिबागमध्ये कोरोनाचा शिरकाव - news about corona virus
रायगड जिल्ह्यातील परहूर ग्रामपंचायत हद्दीतील तलवडे गावातील ३९ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या आरोग्य सेतू अॅपमुळे अलिबाग तालुक्यातील कोरोना बाधितांचा शोध लागला.
तलवडे गावातील तरुण मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी हा तरुण कार्यरत होता. 2 मे ला हा तरुण आपल्या तलवडे या गावी दाखल झाला होता. या पोलिसांची तपासणी ही मुंबई येथे घेण्यात आली असून 4 मे ला त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अलिबाग तालुक्यात कोरोनाचा तरुणामुळे शिरकाव झाला. या तरुणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार असून प्रशासनाने तलवडे परिसर पूर्णपणे कोरोना बाधीत क्षेत्र घोषित करून बंद केले आहे.
शासनाने तयार केलेल्या आरोग्य सेतू या अॅपवर कोणी अलिबागमध्ये पॉझिटिव्ह आहे का हे चेक केले असता दहा किलोमीटर परिसरात एक पॉझिटिव्ह असल्याचे दिसत होते. याबाबत जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाशी संपर्क करून याबाबत माहिती घेण्यास सांगीतली. त्यानंतर परहूर ग्रामपंचायत हद्दीत तलवडे येथे आलेला मुंबई पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे निर्दशनात आले. आरोग्य सेतू अॅपमुळे कोरोना बाधितांचा शोध लागणे सोपे झाले.