रायगड - राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष शेकाप यांची आघाडी आहे. काँग्रेसकडून पेणमधून नंदा म्हात्रे तर उरणमधून डॉ. मनीष पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अलिबागमधील काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोडीमुळे येथील उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेला नाही. मात्र, शेकापने पंडित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे अलिबागमधून काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार हे अजून गुलदस्त्यातच राहिले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असून शेकाप हा मित्रपक्ष सोबत आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत, श्रीवर्धन हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. पेण, उरण, अलिबाग, महाड, पनवेल हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. शेकाप आघाडीत असल्याने पेण, अलिबाग याठिकाणी शेकापचे आमदार 2014 मध्ये निवडून आलेले असल्याने याठिकाणाहून शेकापचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. पेणमधून काँग्रेसने नंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर अलिबागच्या जागेचा तिढा अजून कायम आहे.