महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडात महायुती, आघाडीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

श्रीवर्धनमधून महायुतीचे विनोद घोसाळकर, आघाडीकडून आदिती तटकरे, महाडमधून आघाडीकडून माणिक जगताप, पनवेल महायुतीचे प्रशांत ठाकूर, उरण शेकापकडून विवेक पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले.

रायगडात महायुती, आघाडीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

By

Published : Oct 3, 2019, 9:20 PM IST

Updated : Oct 3, 2019, 11:23 PM IST

रायगड - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, भाजप पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे गुरुवारी सादर केले. यावेळी सर्वच पक्षांनी आपले शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शहरात रस्ते सर्वच पक्षाच्या झेंड्यानी व कार्यकर्त्यांनी बहरले होते.

रायगडात महायुती, आघाडीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज
अलिबाग विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे महेंद्र दळवी, काँग्रेसकडून राजेंद्र ठाकूर, पेण विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे रवींद्र पाटील, कर्जत आघाडीकडून सुरेश लाड,

श्रीवर्धनमधून महायुतीचे विनोद घोसाळकर, आघाडीकडून आदिती तटकरे, महाडमधून आघाडीकडून माणिक जगताप, पनवेल महायुतीचे प्रशांत ठाकूर, उरण शेकापकडून विवेक पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर असून गुरुवार असल्याने अनेक मुख्य उमेदवारांनी गुरुवारचा मुहूर्त साधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक राजकीय पक्षाने आपले शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे रस्त्यावर सर्वच पक्षाचे झेंडे फडकताना दिसत होते.

जिल्ह्यात सातही विधानसभा मतदार संघात 3 ऑक्टोबर पर्यंत 41 उमेदवारांनी 51 नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत.

Last Updated : Oct 3, 2019, 11:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details