रायगड- लोकसभेच्या निवडणुकीत हातात हात घालून काम करणारे शेकाप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणुकीनंतर एकमेकांसमोर भिडले. तालुक्यातील सारळ दत्तपाडा येथे कामाच्या ठेक्यावरून शेकाप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील दोघे जखमी झाले. यातील शेकापचे कार्यकर्ते दशरथ पाटील हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
कामाच्या ठेक्यावरून शेकाप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; शेकापचे दशरथ पाटील गंभीर जखमी
सारळ दत्तपाडा येथे डोंगरावर मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाचे बंगलो स्कीमचे काम सुरू आहे. या कामावरून शेकाप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद आहे. काँगेसचे कार्यकर्ते राजेंद्र ठाकूर, सारळचे सरपंच अमित नाईक तसेच शेकापचे दशरथ पाटील यांच्यात सोमवारी जोरदार वादावादी झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
सारळ दत्तपाडा येथे डोंगरावर मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाचे बंगलो स्कीमचे काम सुरू आहे. या कामावरून शेकाप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद आहे. काँगेसचे कार्यकर्ते राजेंद्र ठाकूर, सारळचे सरपंच अमित नाईक तसेच शेकापचे दशरथ पाटील यांच्यात सोमवारी जोरदार वादावादी झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात लोखंडी सळ्या, काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला. यामध्ये शेकापचे दशरथ पाटील हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दिली आहे.
दुसरीकडे सारळचे सरपंच अमित नाईक यांनीही मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यात खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे पुढील तपास करत आहेत.