रायगड - महाड शहरातील श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने विरेश्वर महाराजांची बहीण असलेली गावदेवी जाकमाता देवीच्या मंदिरात पालखीतून देवीची मिरवणूक काढण्यात आली.
महाड शहरातील छबिना उत्सवाला प्रारंभ; भाविक पालखीत तल्लीन - जाकमाता
यातील सासणकाठी खांद्यावर नाचवण्याचा खेळ संपूर्ण कोकणात एकमेव महाड येथेच खेळला जातो. आज दिवसभर महाड शहरातील बाजारपेठेतून ही उंच सासणकाठ्यांची मिरवणूक पाहणे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले.
सकाळी विधीवत जाकमाता मंदिरात देवीची प्रार्थना करून छबिना उत्सव आनंदात पार पडावा, अशी प्रार्थना करत भाविकांनी व विरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पंचांनी पालखीची सुरुवात केली. पालखीपुढे पावा, झेंडाधारी मानकरी, वेषधारी गोंधळी, मानाचे खांदेकरी आणि पालखीपुढे महाड शहरातील प्रत्येक आळीतून निघालेले आखाडे, खालुबाजावर तल्लीन होऊन नाचणारे लेझीमधारी भाविक महाडकर आणि उंचच उंच सासणकाठी खांद्यावर नाचवणारे भाविक असा भरगच्च जथ्था या मिरवणूकीत सामील झाला आहे.
यातील सासणकाठी खांद्यावर नाचवण्याचा खेळ संपूर्ण कोकणात एकमेव महाड येथेच खेळला जातो. आज दिवसभर महाड शहरातील बाजारपेठेतून ही उंच सासणकाठ्यांची मिरवणूक पाहणे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले. ८ मार्चला महाड येथील विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव संपन्न होत आहे. या छबिन्याला रायगडसह परराज्यातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने येतात. महाशिवरात्रीपासून विरेश्वर महाराजांचा छबीना उत्सव साजरा होत असल्याने महाडकर सध्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत.