रायगड - रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये रोहा डायकेम कंपनीत वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे कंपनीतील 20 कामगारांना बाधा झाली असुन त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रोहा औद्यगिक वसाहतीत वायू गळती प्रकार नेहमी घडत असून अनेक कामगारांचे जीव गेले आहेत. मात्र, याकडे नेहमी दुर्लक्ष होत असून जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.
रोहा डायकेम कंपनीच्या स्टोरेज टॅंकमधून वायू गळती सुरू झाली. या वायू गळतीने कंपनीच्या २० कामगारांना बाधा झाली. त्यानंतर या कामगारांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र कंपनी प्रशासनाने मात्र या कामगारांची विचारपूस करण्याचे देखील कष्ट न घेतल्याने रोह्यात संताप व्यक्त होत आहे. याच कंपनीच्या एका टँकरला देखील आग लागल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. धाटाव औद्योगिक वसाहतीमधील नेहमी वायू गळती होऊन अपघात होत असतात. मात्र याकडे दुर्लक्ष होत असून कामगारांचे नाहक बळी जात आहेत.
रोहा येथील डायकेम कंपनीत वायू गळती, 20 जणांना बाधा - रोहा वायूगळती न्यूज
जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डायकेम कंपनीत घडली आहे.
रोहा येथील डायकेम कंपनीत वायुगळती, 20 जणांना बाधा
कंपनी प्रशासनही कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत, अशा घटना घडल्या की प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळत असते.