महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 21, 2019, 10:24 PM IST

ETV Bharat / state

नवी मुंबई पोलिसांची अनाथ मुलांसोबत 'आपुलकीची' धुळवड

होळीच्या शुभेच्छा देत एकमेकांवर विविध रंगांची बरसात करत, चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरत आणि पाण्यामध्ये चिंब होत पनवेलकरांनी मोठ्या उत्साहात धुळवडीचा आनंद लुटला.

Breaking News

पनवेल- होळीच्या शुभेच्छा देत एकमेकांवर विविध रंगांची बरसात करत, चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरत आणि पाण्यामध्ये चिंब होत पनवेलकरांनी मोठ्या उत्साहात धुळवडीचा आनंद लुटला. नवी मुंबई पोलिसांनीदेखील पनवेलमधील अनाथ मुलांसोबत 'आपुलकीची होळी' साजरी करत अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. यावेळी अनाथ आश्रमातील मुलांनी मुक्तपणे रंगांची उधळण केली.

बालग्राम आश्रमात धुलीवंदनानिमित्त आयोजित केलेल्या रंगोत्सवात अनाथ मुले-मुली मनसोक्त न्हाऊन गेले. लाल, हिरवा, पिवळा, निळा रंगाने या चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंदाचे इंद्रधनुष्य साकारण्याचा प्रयत्न खांदेश्वर पोलिसांनी केला. या रंगोत्सवात सहभागी झालेले हे चिमुकले पहिल्यांदाच रंगपंचमी खेळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. उत्सवाचा आनंद या मुलांनाही घेता यावा, यासाठी खांदेश्वर पोलिसांनी या अनोख्या धुळवडीचे आयोजन केले होते. यावेळी चिमुकल्यांनी गाणी गाऊन, नृत्य करून उपस्थित सर्व पोलिसांचे मनोरंजन केले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नैसर्गिक सुके रंग लावले.

नवी मुंबई पोलिसांची अनाथ मुलांसोबत धुळवड साजरी

दुर्गुणाचे दहन करून सद्गुणांकडे जाण्याचा संदेश देणारा हा सण आहे. मात्र, आपण या सणाला हजारो लिटर पाण्याचा आणि रंगांचा अपव्यय करतो. त्यामुळे अशी धुळवड साजरी करण्यापेक्षा वंचितांच्या आयुष्यात रंग भरायला हवेत, अशी संकल्पना यावेळी खांदेश्वर पोलिसांनी मांडली. नवी मुंबई पोलिसांनी एकत्र येत ही अनोखी धुळवड साजरी करून अनाथ मुलांच्या आयुष्यात माणुसकीचे रंग भरले.

ABOUT THE AUTHOR

...view details