महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी झाली 71 वर्षांची..! रायगडात महामंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा - alibag

रायगड जिल्ह्यातही एसटी आगारात एसटीचा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अलिबाग आगारामार्फत एसटी महामंडाळाचा ७१ वां वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला.

एसटीचा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा

By

Published : Jun 1, 2019, 4:57 PM IST

रायगड -जिल्ह्यातही एसटी आगारात एसटीचा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अलिबाग आगारामार्फत एसटी महामंडाळाचा ७१ वां वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एसटीचा लाल डब्बा बदलून आता बसमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. एसटीने आता जुनी कात टाकून नव्या रुपात प्रवाशांसाठी 'शिवशाही' सेवा सुरू केली आहे, अशी भावना रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी व्यक्त केली आहे.
एसटी बसचा आज 71 वा वर्धापन दिन राज्यात साजरा होत आहे. अलिबाग आगरामार्फत एसटी बस वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात आठ एसटी आगार असून साडे पाचशे बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. एसटीचे 3 हजार कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असून जिल्ह्यात वर्षाला दीड लाख प्रवासी एसटी बसने प्रवास करतात.

एसटी झाली 71 वर्षांची


जुन्या लाल परीने आता कात टाकली असून शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, विठाई या आरामदायी, सुखकारक, वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असल्याचीही माहिती बारटक्के यांनी दिली. रायगड एसटी कर्मचाऱ्यांनी बसचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही बारटक्के यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details