रायगड - मुबंई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आरामबस अवघड वळणावर कोसळून अपघात झाला. या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप असून एक महिला जखमी झाली आहे. आयआरबी यंत्रणा व पोलीस बस काढण्याचा प्रयत्न करीत आहे. या अपघाताने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
बोरघाटातील चढावरुन आरामबस मागे सरकली, कठड्यावर अडकल्याने जीवितहानी टळली
मुंबई-पुणे मुबंई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आराम बस कोसळल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मुंबईकडून (एमएच ०४/ एफके ०२०१) ही ट्रॅव्हल्स बस पुणेकडे जाण्यास निघाली होती. खोपोलीतील बोरघाट येथे बस आली असता अवघड वळणावर चालकाला बस चढविताना कठीण गेले. त्यामुळे बस चढणीवरून मागे सरकून सुरक्षा कठड्यावर अडकल्याने पुढील होणार अनर्थ टळला.
या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप असून एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. आयआरबी यत्रंणा, खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीकरीता घटनास्थळी दाखल होऊन प्रवाशांना बाहेर काढले. दरम्यान, जखमी महिलेला खोपोली खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बस काढण्याचे काम सुरू आहे.