महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटीत बॉम्ब सापडल्या प्रकरणी तपासाला वेग, आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात? - रायगड

या बॉम्बचा प्रवास अरिबाग - कर्जत ते कर्जत - आपटा असा झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. लवकरच बॉम्ब ठेवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस ठाणे

By

Published : Feb 23, 2019, 11:04 PM IST

रायगड - पनवेल तालुक्यातील आपटा येथे कर्जत-आपटा एसटी बसमध्ये बॉम्ब आढळून आल्याने खळबळ माजली होती. हा बॉम्ब अलिबाग-कर्जत या बसमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला गती दिली आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हा बॉम्ब अलिबाग-कर्जत या एसटी बसने आला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणेकडून आता अलिबागपासून ते कर्जत असा शोध सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. त्यामुळे बॉम्ब ठेवणारा अज्ञात व्यक्ती हा लवकरच ताब्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून बोलून दाखविला जात आहे.

अलिबाग आगारातून (एमएच १४ बीडी २७२४) क्रमांकाची बस कर्जतला जाण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये चालक गजानन जारंडे आणि वाहक पुजाराम मेंडके हे दोघे होते. ही बस वाहतूक कोंडीमुळे रात्री पावणे नऊ वाजता कर्जतला पोहोचली. या बसमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीने बॉम्बची पिशवी वाहकांच्या सीटवरील वरच्या बाजूस ठेवली आणि तो पसार झाला. बस कर्जत आगारात पोहोचल्यानंतर वाहक मेंडके बस खाली उतरून आपला डबा आणण्यासाठी गेले. त्यामुळे चालक गजानन जारंडे यांनी उतरताना वाहक मेंडके यांच्या सामानासह बॉम्बची प्लास्टिक पिशवी सुद्धा घेतली.

अलिबाग-कर्जत ही बस कर्जत डेपोत सोडून चालक जारांडे यांनी कर्जत-आपटा बसमध्ये (एमएच १४/ बीटी १५९१) स्वतःचे व वाहकाचे सामान ठेवले. त्यानंतर नऊ वाजता कर्जतवरून आपटाकडे जाण्यासाठी चालकाने बस सुरू केली. आपटा येथे आल्यानंतर चालक जारंडे याने वाहक मेंडके यांना तुझी पिशवी घे म्हणून सांगितले. तेव्हा मेंडके यांनी माझ्याकडे कोणतीही प्लास्टिक पिशवी नाही असे सांगितले. त्यामुळे जारंडे यांनी उचललेली प्लास्टिक पिशवी मेंडके यांनी तपासली असता, त्यात त्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे निर्दशनास आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details