पनवेल - भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मेले याचा आकडा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केला होता. यावरून भारिप नेते प्रकाश आंबेडकर पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यावर चांगलेच बरसले. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले याचा आकडा सांगून जुमलेबाजी करणारे भाजप सरकार आहे, असे वक्तव्य त्यांनी निशाणा साधला.
मृत दहशतवाद्यांचा आकडा सांगून भाजप जुमलेबाजी करतेय - प्रकाश आंबेडकर
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठी जीवितहानी झाली नसल्याचे सांगून भाजपच्या दाव्याची चिरफाड केल्याचे भारिप नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पनवेलमध्ये नुकतीच वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा पार पडली. हल्ल्यात किती दहशतवादी मेले हे अमित शहा यांना कोणी विचारले होते का? असा प्रश्न विचारत आंबेडकर यांनी प्रतिहल्ला चढवला. अमित शहा यांनी २५० अतिरेकी मारले गेल्याचा दावा केला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठी जीवितहानी झाली नसल्याचे सांगून भाजपच्या दाव्याची चिरफाड केल्याचे भारिप नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हल्ल्यानंतर ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. एवढे पाकिस्तानी झेंडे येतात कुठून, अगोदरच झेंडे प्रिंट केले होते का? हे सगळे आधीच ठरले होते का? असा खोचक सवाल देखील आंबेडकर यांनी विचारला.