महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाबत चिंता करणे टाळा, वेळीच उपचार केल्यास करू शकता मात - मानसोपचार तज्ज्ञ डॉ अमोल भुसारे - Psychiatrist Dr Amol Bhusare

आजारावर मात करताना कोरोना रुग्णांनी मनातील कोरोनाविषयी भीतीची चिंता मनात बाळगू नये, असे मत जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ अमोल भुसारे यांनी मांडले आहे.

Amol Bhusare
मानसोपचार तज्ज्ञ डॉ अमोल भुसारे

By

Published : May 10, 2021, 3:39 PM IST

Updated : May 10, 2021, 6:54 PM IST

रायगड - कोरोना लागण झाली तर माझं कसं होणार, मी यातून बरा होणार की नाही असे नकारात्मक विचाराने भीती आणि चिंता नागरिकांमध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे या आजारावर मात करताना कोरोना रुग्णांनी मनातील कोरोनाविषयी भीतीची चिंता मनात बाळगू नये, असे मत जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ अमोल भुसारे यांनी मांडले आहे.

माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे

कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन कोरोनावर मात करू शकतात. असे आवाहनही डॉ अमोल भुसारे यांनी केले आहे.

हेही वाचा -लग्नातील फोटो देण्याच्या बहाण्याने केली मैत्री, ठेवले शारीरिक संबंध, पोलिस तक्रार दाखल

कोरोनाविषयक भीतीची चिता बाळगू नका, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट घातक असल्याचे बोलले जात असून तिसरी येणारी लाट याहून भयानक आहे असे वारंवार बोलले जात आहे, सोशल मीडिया, बातम्या, चर्चेतून हा विषय सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना आपल्याला झाल्यानंतर आपले कसे होणार याची चिंता प्रत्येकाला सतावत आहे. त्यामुळे कोरोनाविषयक भीतीची चिंता ही आपल्याला मारक आहे.

सोशल मीडिया, बातम्या द्वारे सकारात्मक विचार, चर्चा होणे गरजेचे कोरोनाच्या या काळात सकारात्मक गोष्टी ऐवजी नकारात्मक गोष्टी जास्त पसरत आहेत. याचाच परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. एखादा व्यक्ती होम आईसोलेशन मध्ये वा रुग्णालयात राहून बरा होतो. यावेळी तो डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेऊन बारा झाला असे वृत्त येणे गरजेचे आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णानेही आपण डॉक्टरांचा सल्ला ऐकून उपचार करून घेतले आणि बरा झालो हे सांगणे गरजेचे आहे. जेणेकरून समोरचा कोरोना व्यक्तीच्या मनातील कोरोना विषयक भीती, चिंता दूर होऊन तो सुद्धा सकारात्मक विचार करू शकतो असे मत डॉ भुसारे यांनी मांडले आहे. सकारात्मक विचार मनात आणा आणि कोरोनाला पळवा कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाच्या विचार करण्याच्या वृत्तीत बदल होत चालला आहे. आज एवढे कोरोनाने मृत्यू झाले, आज दोनशेहून अधिक कोरोना रुग्ण सापडले या महितीनेही नागरिक घाबरून जात आहेत. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाहीत याबाबतही चर्चा होत असते. मात्र अनेकवेळा आपल्यात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यास अनेकजण त्याकडे कानाडोळा करतो आणि परिस्थिती हाताबाहेर गेली की रुग्णालयात दाखल होतो. अशाही परिस्थीती डॉक्टर त्या व्यक्तीस वाचविण्याचा प्रयत्न करून त्यास वाचवतो पण काही वेळेला उशीर झाल्याने व्यक्ती दगावतो. याचा दोष हा डॉक्टर, यंत्रणाना दिला जातो. मात्र वेळीच रागाचे निदान झाल्यास उपचार घेतल्यास कोरोनाला आपण हरवू शकतो ही बाब प्रत्येकाने ओळखणे गरजेचे आहे. यासाठी सकारात्मक विचार मनात बाळगल्यास कोरोनावर मात करणे कठीण नाही, असे मत मानसोपचार तज्ञ डॉ अमोल भुसारे यांनी मांडले आहे.

हेही वाचा -नागपुरात वेश्यांसाठी पोलिसांचा मदतीचा हात, दोन वेळच्या जेवणाची केली सोय

Last Updated : May 10, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details