पनवेल- नावडे वसाहतीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता गेल्या 8 वर्षांपासून प्रतीक्षा असलेले जास्त क्षमतेचं मलनिस्सारण केंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे. नावडे वसाहतीत साडेतीन दशलक्ष लीटर इतक्या क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारण्यासाठी सिडको मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. नुकतीच सिडकोने साडेतीन दशलक्ष लीटर क्षमतेच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच्या कामाची निविदा जाहीर केली आहे.
नावडे वसाहतीतील मलनिस्सारण केंद्राला अखेर ‘ग्रीन सिग्नल’ हेही वाचा - रायगडमध्ये CAA आणि NRC विरोधात 'संयुक्त समाज म्हसळा तालुका' तर्फे 'एकता रॅली'चे आयोजन
सुरुवातीला नावडे वसाहतीतील सांडपाणी थेट खाडीपात्रात सोडले जात होते. त्यामुळे नागरिकांना पाणी प्रदूषणाचा फटका सहन करावा लागत होता. अखेर कमी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात आले. परंतु, नावडे वसाहतीत सुमारे 100 इमारती आहेत. काही भूखंडावर अजूनही इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता हे मलनिस्सारण केंद्र अपुरे पडत होते. तसेच वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, कठीण झाले होते. त्यामुळे प्रदूषणाचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर नुकतंच सिडको महामंडळाने कायमस्वरूपी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - रायगड जिल्हा परिषद : अध्यक्षपदी शेकापच्या योगिता पारधी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे
नावडे वसाहतीतील जवळपास 70 गुंठे जमिनीवर हे मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी जवळपास 13 कोटी इतका खर्च येणार आहे. या मलनिस्सारण केंद्राच्या कामाची निविदा जाहीर केली आहे. कंत्राटदाराला पुढील 24 महिन्यात या केंद्राचे बांधकाम करून 5 वर्ष हे केंद्र चालविण्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.