महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 23, 2020, 2:35 AM IST

ETV Bharat / state

रायगड जिल्हाधिकारीपदी निधी चौधरींची नियुक्ती

प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यावर परिविक्षण कालावधीत त्यांनी काही काळ उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्या १ सप्टेंबर २०१४ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचे वादविवाद सोडवण्यात निधी चौधरी यांची महत्वाची भूमिका होती.

Appointment of Nidhi Chaudhary as Collector of Raigad
रायगड जिल्हाधिकारीपदी निधी चौधरींची नियुक्ती

रायगड -पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या उपसचिव निधी चौधरींची रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या २०१२ पासून भारतीय प्रशासकीय सेवत कार्यरत आहेत. राजस्थान मधील नागौर जिल्ह्याच्या रहिवाशी असणाऱ्या निधी चौधरी यांनी आपले उच्च शिक्षण जयपूर येथे पुर्ण केले आहे. लोक प्रशासन या विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. प्रशासकीय सेवेत येण्यापुर्वी त्या काही काळ रिजर्व्ह बँकेतही कार्यरत होत्या. २०१२ साली त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांना महाराष्ट्रात नियुक्ती देण्यात आली आहे.

प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यावर परिविक्षण कालावधीत त्यांनी काही काळ उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्या १ सप्टेंबर २०१४ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचे वादविवाद सोडवण्यात निधी चौधरी यांची महत्वाची भूमिका होती. यानंतर पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर पालिकेच्या उपआयुक्त म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details