रायगड - जिल्हा सामान्य रुग्णालय हे डॉक्टर कमी, अस्वच्छता, ढिसाळ कारभार यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यात आता आणखीन एका समस्येची वाढ झाली आहे. ती म्हणजे इंजेक्शनची कमतरता. रुग्णालयात सध्या अँटिबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा असून रुग्णांना बाहेरून इंजेक्शन आणण्याची वेळ जिल्हा सामान्य रुग्णालयावर आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णाला उपचारासाठी खासगी मेडिकलमधून इंजेक्शन आणावे लागत असल्याची बाब समोर आली आहे.
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटिबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा हेही वाचा...अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला पुन्हा लागली आग, जीवितहानी नाही
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या औषध भंडार विभागात सध्या रुग्णांना उपचारादरम्यान लागणारी अँटिबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा आहे. साप, विंचू, कुत्रा वा इतर विषारी रोगावर उपचारासाठी लागणारी इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे या रोगांवर उपचार करणारी इंजेक्शन रुग्णांना मिळत आहेत. मात्र गंभीर आजार बरा करणारी आवश्यक अँटिबायोटिक इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णाला बाहेरून ही इंजेक्शन आणावी लागत आहेत.
राज्य शासनाने राज्यातील शासकीय रुग्णालयात सर्व औषध वितरित करण्याची जबाबदारी ही हाफकीन संस्थेला दिलेली आहे. मात्र राज्यभर औषध वितरित करण्यात हाफकीन संस्थेला जमत नसल्याने अनेक वेळा औषधांचा तुडवडा जिल्हा तसेच शासकीय रुग्णालयात जाणवू लागला आहे. पूर्वी आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालयला औषध खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. मात्र 2017 नंतर औषध वितरित करण्यासाठी हाफकीन संस्थेला अधिकार दिल्याने औषधांचा तुटवडा रुग्णालयात जाणवू लागलेला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे शासनाने पुन्हा औषध खरेदीसाठी रुग्णालयालाच अधिकार देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा...कोरेगाव भीमा प्रकरण: ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून महाविकासआघाडीत ठिणगी
अँटिबायोटिक इंजेक्शन साठा रुग्णालयात नसल्याने रुग्णाच्या उपचारासाठी डॉक्टरांना बाहेरून इंजेक्शन मागवावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णासह डॉक्टरांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील इंजेक्शन साठच्या कमतरतेबाबत प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा इंजेक्शन कमतरतेमुळे एखाद्या रुग्णाचा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
'जिल्हा सामान्य रुग्णालयात जीव वाचवणारी इंजेक्शन उपलब्ध आहेत. अँटिबायोटिक इंजेक्शन कमतरता असली तरी रुग्णांना बाहेरून इंजेक्शन जिल्हा रुग्णालयामार्फत दिले जात आहे. त्याचा रुग्णावर ताण दिला जात नाही. लवकरच अँटिबायोटिक इंजेक्शन साठा उपलब्ध केला जाईल, असे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी सांगितले आहे.