रायगड - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय नेते सध्या वेगवेगळ्या युक्ती लढवत आहेत. श्रीवर्धन मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या प्रचारासाठी बंधू आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत चक्क लोकलने प्रवास केला. अनिकेत तटकरेंच्या या सामान्य रुपाची चर्चा श्रीवर्धन मतदारसंघात सुरु आहे.
आदिती तटकरेंच्या प्रचारासाठी अनिकेत तटकरेंचा लोकलने प्रवास हेही वाचा - निवडणुकीतले 'बाप'माणूस; मुलांसाठी करतायेत जीवाचं रान
हेही वाचा - 'काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळावे असे एखाद्या शेंबड्या पोरालाही वाटणार नाही'
रविवारी नालासोपारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडी पक्षाच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन मतदार संघातील विरार, नालासोपारा, वसई व भाईंदर निवासी चाकरमन्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादीचे म्हसळा मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, रवी तटकरे, सुनील शेडगे, विजय गिजे, वसंत नलावडे, विलास जांभळे, महेंद्र पेंढारी, अनंत फीलसे यांच्यासहीत 250 ते 300 चाकरमानी उपस्थित होते. या मेळाव्यात सर्व मुंबईस्थीत चकरमन्यांनी अदिती तटकरे यांना आपली पहिली पसंती दाखवली. तसेच त्यांच्या विजयाचा संकल्प करीत बहुमताने त्यांना निवडून देण्याचा निर्धार चाकरमान्यांनी केला.