महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड लोकसभा : अनंत गितेंची हॅटट्रिक हुकली, सुनिल तटकरे झाले रायगडचे नवे खासदार

रायगड मतदार संघात सुनील तटकरेंचा विजय. तटकरेना 4 लाख 86 हजार 968 मते तर अनंत गीतेना 4 लाख 55 हजार 530 मते, 31 हजार 438 मतांनी सुनील तटकरे विजयी घोषित.

अनंत गिते आणि सुनिल तटकरे

By

Published : May 23, 2019, 6:02 AM IST

Updated : May 23, 2019, 7:43 PM IST

३.०४ - सुनिल तटकरे विजयी, अनंत गितेंचा केला पराभव

१.५५ - सुनिल तटकरे ८२३५ मतांनी आघाडीवर

१.३० - सुनिल तटकरेंच्या मतात वाढ, गितेंवर घेतली ५२६१ ची आघाडी

१.०० - १७ व्या फेरीत ही आघाडी ५५०० झाली. त्यानंतर पुढील फेरीत ही आघाडी ७ हजार मतांनी वाढली. परंतु पुढील फेरी हे मताधिक्य घटले. आता तटकरे ३८०० मतांनी पुढे आहेत.

१२।०० - १६ व्या फेरीच्या मतमोजणीत सुनिल तटकरे ५०० मतांनी आघाडीवर होते. तर १७ व्या फेरीत ही आघाडी ५५०० झाली आहे.

११.२० - ११ व्या फेरी अखेर अनंत गिते ७३८१ मतांनी आघाडीवर

११.०० पाच्या फेरी अखेर अनंत गिते ८७९२०, सुनिल तटकरे ९३८४६

१०. २७ प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार अनंत गिते १२०० मतांनी आघाडीवर

१०.१५ - चौथ्या फेरीमध्ये अनंत गिते ७०,५५१, सुनिल तटकरे ७५, ७१०

१०.०० - तिसऱ्या फेरीमध्ये अनंत गिते ५५६१२, सुनिल तटकरे ५७८१६

९.५० - अनंत गिते १८,९१८, सुनिल तटकरे १९७१५, दुसऱ्या फेरी अखेर

९.१५ - राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे ५०२४ मतांनी आघाडीवर

८.५५ - राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे आघाडीवर

८.३० - शिवसेनेचे अनंत गिते आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे १४०० मतांनी आघाडीवर

पोस्टल मतमोजणीला सुरुवात

6800 पोस्टल मतदान

८.०० - प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात
७.४५ - उमेद्वारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात दाखल
७.३० - मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल जामर कार्यान्वित
७.०० - मतमोजणी अधिकारी व कर्मचारी मतमोजणी केंद्रावर दाखल. तयारी पूर्ण

रायगड - रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जातेय. थोड्याच वेळात येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. येथून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे मैदानात उतरलेत. आता येथून गीते हॅट्रीक साधणार की, तटकरे त्यांना क्लिन बोल्ड करीत दिल्ली गाठणार हे आज स्पष्ट होणार आहे.

२०१४ ची परिस्थिती
२०१४ च्या मोदी लाटेत शिवसेनेचे अनंत गीते हे अवघ्या २ हजार १०० मतांनी विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरेंचा पराभव केला होता. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शेकाप आघाडीत सामील झाल्याने सुनील तटकरेंना बळ मिळाले आहे. त्यामुळे गीते हॅट्रीक करणार की तटकरे बाजी मारत दिल्ली गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२०१९ मधील एकूण मतदारसंख्या - १६ लाख ३९ हजार १६२. यावेळी या मतदारसंघात एकूण १० लाख २० हजार १८५ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६४.४७ टक्के मतदानाची नोंद झाली.

रायगड लोकसभेत दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ असले तरी वंचित बहुजन आघाडी, बसप, अपक्ष यांच्या मतांचा फटका हा दोन्ही उमेदवारांना बसणार आहे. त्यामुळे सुनील तटकरे व अनंत गीते हे दोघेही जिंकण्याचा दावा करत असले तरी शेवटच्या मतपेटीपर्यंत ही लढत झुंजणार हे मात्र नक्की.

Last Updated : May 23, 2019, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details