महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरडीसीसी बँकेतील भ्रष्टाचाराबाबत रान उठवणार  - अनंत गिते - gite

उमेदवरी अर्ज भरल्यानंतर कुरूळ यथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात गिते यांनी सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते

By

Published : Mar 29, 2019, 10:03 AM IST

रायगड - शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील जिल्ह्यातील भ्रष्टचारी नेत्याला घेऊन फिरत असून जरा जास्तच बोलत आहेत. त्यांनी आपली बुध्दी गहाण ठेवून भ्रष्टाचाराच्या भस्मासूराला मोठा करत आहेत. त्यामुळे आतारायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (आरडीसीसी) भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालून त्याविरोधात रान उठवून त्यांनाधडा शिकवणार, असाइशारा शिवसेना-भाजप युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी गुरुवारी अलिबाग येथे दिला.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते


अनंत गिते यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी आपला उमेदवरी अर्ज भरला. त्यानंतर कुरूळ यथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात गिते यांनी सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. बॅ. ए. आर. अतुले यांनी काँग्रेस वाढवली, जागवली. ते राष्ट्रीय नेते होते. ते कोकणचे भाग्यविधाते होते. त्यांच्यामुळे काही लोक मोठे झाले. त्यांनी नंतर बॅ. अंतुले यांच्याशी गद्दारी केली. अशा गद्दारांना रायगडातून हद्दपार करा, असे भावनिक आवाहनअनंत गिते यांनी यावेळी केले.


आमची युती नसून मनोमिलन झाले आहे. आघाडी केवळ राष्ट्रवादी आणि शेकापच्यानेत्यांची झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची आघाडी झालेली नाही. त्यामुळे या आघाडीला मी मुळीच घाबरत नाही. ही भ्रष्टाचार विरूध्द सदाचार, अशी लढत आहे. सहा वेळा खासदार झालो. तीन वेळा केंद्रात मंत्री होतो. मात्र, माझ्या चारित्र्यावर डाग नाही. निष्कलंक खासदार म्हणून मला निवडून द्या, असे आवाहन गिते यांनी केले आहे.


राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सिडकोचे अध्यक्ष आमादार प्रशांत ठाकूर, रायगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, आमदार निरंजन डावखरे, बाळासाहेब पाटील, विजय कवळे, महेंद्र दळवी, सुरेद्र म्हात्रे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षीत आहे. देश वाचविण्यासाठी शिवसेना-भाजपा युती झाली आहे. देशाला आणि राज्याला भ्रष्टाचार्‍यांपासून वाचविण्यासाठी अनंत गिते यांच्यासारखे खासदार निवडून आले पाहिजे, असे सुभाष देसाई यावेळी म्हणाले.अनंत गिते हे गरिबीतून आलेले आहेत. त्यांना गरिबांची जाण आहे. काम केल्यामुळेच ते सहावेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी देखील तेच निवडून येतील, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

अनंत गिते यांनी मागील ५ वर्षे मित्र म्हणून काम केले आहे. त्यांच्या कालावधीत अनेक योजना या मतदारसंघात यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे मत मागण्याचा अधिकार त्यांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी गिते यांना निवडून आणायचे आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांच्या खाद्याला खांदा लावून काम कारावे, असे आवाहन प्रशांत ठाकुर यांनी केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी त्यांचा शिलेदार म्हणून काम करण्यासाठी अनंत गिते यांना विजयी करा, असे आमदार भरत गोगावले म्हणाले.


ही लढाई भ्रष्टाचार विरूध्द सदाचार अशी आहे. भ्रष्टाचार्‍यांच्या भुलथापांना बळी पडू नका. भ्रष्टाचार्‍यांना गावात थारा देऊ नका. प्रत्येकाने आपले काम चोख बजावल्यास अनंत गिते निवडून येण्यात कोणतीच अडचण येणार नाही, असे प्रविण दरेकर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा शिवसेना पक्ष आहे. त्यामुळे मी या पक्षात प्रवेश केला आहे. मला खात्री आहे, की अनंत गिते हेच या मतदारसंघाचा विकास करू शकतील, असे नविद अंतुले म्हणाले.


त्यापूर्वी अनंत गिते यांनी गुरुवारी सकाळी अलिबागची ग्रामदैवत काळंबादेवीचे दर्शने घेतले. त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्या समवेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details