रायगड- आकाशात उडणारी विमाने आपण नेहमी जमिनीवरुन पाहत असतो. परंतु, ही प्रवासी आणि सैन्यातील विमाने प्रत्यक्ष उडताना वा उतरताना पाहण्याचा योग काही जणांनाच मिळत असतो. मात्र, हा अनुभव लायन्स क्लब ऑफ श्रीबागने, हवाई व फायटर विमानाच्या प्रतिकृतीच्या प्रात्यक्षिक कसरती दाखवून अलिबागकरांना दिला आहे.
समुद्र किनारी अलिबागकरांनी अनुभवल्या विमानांच्या चित्तथरारक कसरती - raigad
अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोली समुद्र किनारी मैदानावर आज अलिबागकरांना तसेच बच्चे कंपनीला हवाई विमानाच्या प्रतिकृतींची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.
अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोली समुद्र किनारी मैदानावर आज अलिबागकरांना तसेच बच्चे कंपनीला हवाई विमानाच्या प्रतिकृतींची प्रात्यक्षिके करुन दाखवण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी हवाई विमानाची प्रात्यक्षिके बघण्यास गर्दी केली होती.
अहमदनगरमधील जहांगीरदार एरो प्रॉडक्ट कंपनीच्या माध्यमातून या हवाई विमानाची प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी ट्रेनर विमान, अगली स्टिक, मिनी अल्ट्रा स्ट्रिक, हवाई कसरत, सुखोई फायटर विमान, उडती तबकडी, टेली मास्टर पुष्प वृष्टी या प्रकारची हवाई विमाने आकाशात उडविण्यात आली. हा शो पहिल्यांदाच पाहायला मिळल्याने नागरिकांनी लायन्स क्लब ऑफ श्रीबागचे आभार मानले आहेत.