महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळा शहरात अफगाणी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट - tala police station news

अफगाणिस्तानहून आलेल्या एका 22 वर्षीय महिलेने रायगड जिल्ह्यातल तळा येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत महिलेला 11 महिन्याचे बाळ असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 9, 2020, 8:20 PM IST

रायगड - जिल्ह्यातील तळा येथे मुळ अफगाणी असलेल्या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली बुधवारी (दि. 9 डिसें.) आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. बावीस वर्षीय या महिलेला अकरा महिन्याचा बालक आहे. महिला ही बाळंतपणासाठी अफगाणिस्तानातून तळा येथे आली होती.

टाळेबंदीमुळे भारतातच अडकले होते दाम्पत्य

तळा येथील रहिवासी असलेले मृत महिलेचे पती हे अफगाणिस्तान येथे डॉक्टर म्हणून काम करतात. कोरोनापूर्वी मृत महिला आणि तिचे पती हे तळा येथे आले होते. त्यानंतर टाळेबंदीत दोघेही अडकले होते.

शेजाऱ्यांनी तोडला दरवाजा

बुधवारी (दि. 9 डिसें.) दुपारी एका खोलीत बाळ रडत असल्याने याबाबत घरातील इतरांना शंका आली. त्यावेळी त्यांनी दरवाजा ठोकला पण आतून कोणी दरवाजा उघडत नसल्याने बाहेरील बाजूस असलेल्या खिडकीतून पहिले तेव्हा महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून तो उघडला त्यावेळी महिला ओढणीने गळफास अवस्थेत दिसली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला

त्यानंतर तळा पोलिसांना तत्काळ याबाबत कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुगणलायत पाठविले. आत्महत्येबाबत तळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मृत महिलेच्या पतीला अजून एक पत्नी असल्याचे कळते आहे.

हेही वाचा -विशेष : कोरोना महामारीतही रायगड जिल्ह्यात 75 टक्के लसीकरण पूर्ण

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही बैलगाडी शर्यतींचे आयोजन

ABOUT THE AUTHOR

...view details