महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह सापडलेल्या 'त्या' मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक - प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह पनवेल बातमी

पनवेलमधील कुंडेवहाळ गावच्या हद्दीत पळस्पे-उरण मार्गाच्या शेजारी सोमवारी सकाळी प्लास्टिकच्या गोणीत लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून या मुलाची ओळख पटली.

accused-of-killing-that-child-found-in-panvel
प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह सापडलेल्या 'त्या' मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक

By

Published : Dec 18, 2019, 4:37 PM IST

Updated : Dec 18, 2019, 5:34 PM IST

रायगड- दोन दिवसांपूर्वी जेएनपीटीजवळच्या कुंडेवहाळ गावात एका आठ ते नऊ वर्षाच्या मुलाचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत आढळला होता. यामुळे एकच खळबळ माजली होती. या मृत मुलाची ओळख पटल्यानंतरच आज त्याची हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध घेण्यात पनवेल शहर पोलिसांना यश मिळाले आहे. हे दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून अधिक चौकशी सुरू आहे.

'त्या' मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक

हेही वाचा-नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक

पनवेलमधील कुंडेवहाळ गावच्या हद्दीत पळस्पे-उरण मार्गाच्या शेजारी सोमवारी सकाळी प्लास्टिकच्या गोणीत लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून या मुलाची ओळख पटली. या मृत मुलाचे नाव सुरज उर्फ मोनू उपेंद्र साही असे असून तो पनवेल रेल्वे स्टेशनच्या जवळच राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या मृत मुलाचे घर गाठले. घटनेबाबतचा तपास सुरू केला. लहानग्या सुरज उर्फ मोनूची हत्या त्याच्या ओळखीतील व जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

धक्कादायक बाब म्हणजे त्याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानुसार आज पनवेल शहर पोलिसांनी दोन जणांना अटक केली. त्याची हत्या कुणी व का केली, याबाबत आरोपींकडे चौकशी सुरू आहे. राकेश अंबाजी तांबडे, (वय 32) आणि रमेश ऊर्फ कांती लक्ष्मण पाचंगे (वय 33) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. यातील राकेश तांबडे हा रिक्षाचालक असून तो खांदा गावमधल्या गणेश मंदिरसमोर राहणारा आहे. तर दुसरा आरोपी रमेश पाचंगे हा पनवेल रेल्वे स्टेशनसमोरील फुटपाथ व फिरस्ता आहे. या आरोपींना आज न्यायालयात रिमांडकरीता हजर केले असता, त्यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

Last Updated : Dec 18, 2019, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details