महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, व्यक्तीला उडवून वाहन पसार - अपघात

मुंबई-पुणे महामार्गावर एका व्यक्तीला वाहनाने उडवले. वाहन पसार झाले आहे. संबंधीत व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

By

Published : May 28, 2021, 1:32 AM IST

रायगड - मुंबई-पुणे महामार्गावर पुणे लेनवर व्यक्तीला वाहनाने उडवले. संबंधीत व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. त्याला तत्काळ खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अज्ञाताला उडवून वाहन पसार

मुंबई - पुणे महामार्गावर काल (27 मे) रात्री 11 वाजून 20 मिनिटांच्या आसपास पुणे लेनवर एका व्यक्तीला वाहनाने मागून ठोकर दिली. या अपघातात संबंधीत व्यक्तीला मोठी दुखापत झाली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्याला खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, व्यक्तीला ठोकर मारल्यानंतर संबंधीत वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव अद्याप कळू शकले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच...

हेही वाचा -धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे आतड्यात पडले छिद्र; जगातील पहिलीच केस

ABOUT THE AUTHOR

...view details