महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 20, 2020, 10:26 AM IST

Updated : Feb 20, 2020, 10:42 AM IST

ETV Bharat / state

पुणे-माणगाव मार्गावर ताम्हणी घाटात अपघात; तिघांचा मृत्यू

पुणे-माणगाव मार्गावर ताम्हणी घाटात कारचा अपघात झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार झाडावर जाऊन आदळली. जखमींवर माणगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडला.

ताम्हणी घाटात अपघात
ताम्हणी घाटात अपघात

रायगड - पुणे-माणगाव महामार्गावर ताम्हणी घाटात कारचा अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे. माणगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. हा अपघात रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला.

निखिल गुळे, चंद्रकांत निकम, विक्रम शिंग, अशी मृतांची नावे आहेत. तर विजय पाटील आणि सुनील टेलएंगे हे जखमी झाले आहेत. पुणे येथून पाच जण कारने दिवेआगर येथे येत होते. ताम्हणी घाटात कार आली असता चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार झाडावर जाऊन आदळली असल्याची माहिती मिळत आहे.

Last Updated : Feb 20, 2020, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details