महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बस-ट्रकचा, अपघात चार जखमी

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खालापूर विणेगाव येथे एसटी बसची ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

By

Published : Aug 14, 2019, 2:31 PM IST

अपघातग्रस्त वाहने

रायगड- मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खालापूर विणेगाव येथे एसटी बसची ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वाहक, चालक, २ प्रवासी असे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर चौक ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांत एसटी बस अपघाताची जिल्ह्यातील तिसरी घटना आहे.

खोपोली येथून एसटी बस (एम एच २० बि एल २२३२) प्रवाशांना घेऊन पनवेलकडे निघाली होती. सकाळी आठ वाजता बस खालापूर विणेगाव येथे आली असता रस्त्याला वाहतूक कोंडी होती. अशा वेळी एसटी बस पुढे जाणारा ट्रक (के ए ०१ ए जे ४१९) अचानक थांबल्याने एसटी चालकाचे नियंत्रण सुटून बस ट्रकवर जाऊन आदळली.


या अपघातात चालक, वाहक व दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना बस मधून सुरक्षितपणे काढून चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, काही दिवसांपासून एसटी बसच्या अपघातात वाढ होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details