महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अदिती तटकरेंचे आश्वासन ठरले फोल, गणपतीपूर्वी शुद्ध पाणी देण्याचं दिलं होतं आश्वासन

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून अलिबाग तसेच रोहा तालुक्यातील गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्याने नागरिकांना नेहमीच अशुद्ध पाणी पुरवठा होतो. याबाबत नागरिकांनी वारंवार अर्ज, आंदोलने केली. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून वाढीव उमटे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजने अंतर्गत 4.5 एम एल डी वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारला. यासाठी साधारण दीड कोटी खर्चही करण्यात आला

रायगड मथ्ये नळाला अशुद्ध पाणी

By

Published : Sep 5, 2019, 10:04 PM IST

रायगड- अलिबाग तालुक्यातील 60 गावातील लाखो नागरिकांना उमटे धरणातून गेल्या 35 वर्षांपासून नळाद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. उमटे धरणावर दीड कोटी खर्च करुन जलशुद्धीकरण प्रकल्प तयार केला आहे. गणपती येण्याच्या अगोदर पूर्वी उमटे धरणातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल, असे जि.प अध्यक्षा अदिती तटकरे यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले होते. मात्र, गणरायाचे आगमन होऊन गणरायाला निरोप देण्याचे दिवस जवळ आले, तरी स्थानिक ग्रामस्थ व गणपतीसाठी आलेल्या चाकरमान्यांना मातीमिश्रित अशुद्ध पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन व अध्यक्षा यांना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीच काळजी नसल्याचे यावरुन दिसत आहे.

रायगड मथ्ये नळाला अशुद्ध पाणी

हेही वाचा-VIDEO : अंतराळवीर उतरला चंद्रावर अन् बाजुने जाऊ लागली वाहने..

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून अलिबाग तसेच रोहा तालुक्यातील गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्याने नागरिकांना नेहमीच अशुद्ध पाणी पुरवठा होतो. याबाबत नागरिकांनी वारंवार अर्ज, आंदोलने केली. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून वाढीव उमटे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजने अंतर्गत 4.5 एम एल डी वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारला. यासाठी साधारण दीड कोटी खर्चही करण्यात आला. मात्र, प्रकल्प पूर्ण होऊन दोन ते तीन महिने झाले, तरी अद्यापही या जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. नागरिकांना नळाद्वारे सध्या येत असलेले पाणी हे मातीमिश्रित आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी भांड्यात भरल्यानंतर त्यामध्ये तुरटी फिरविल्यानंतर मातीचा गाळ साचत आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेरुन पाणी विकत आणून प्यावे लागत आहे. मात्र, नागरिकांच्या या आरोग्य विषयक समस्येकडे जिल्हा परिषद प्रशासन व सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


22 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा संपन्न झाली. या सभेत उमटे धरणातील अशुद्ध पाण्याचा प्रश्न राजीपचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी अशुद्ध पाणी भरलेली बाटली सभागृहात आणली होती. त्यावेळी जि.प अध्यक्षा अदिती तटकरे यांनी गणपतीपूर्वी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करुन नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल, असे सभागृहात उत्तर दिले होते. मात्र, गणरायाचे आगमन झाले, तरी शुद्ध पाणी काही मिळत नाही. त्यामुळे अध्यक्षा यांनी वेळ मारुन नेण्यासाठी असे उत्तर सर्व साधारण सभेत दिले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्यास पाच ते सहा वर्षे लागली असून पूर्वीच्या ठेकेदाराला काम पूर्ण न करता आल्याने दुसऱ्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले. त्यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्णही केले आहे. मग नागरिकांना शुद्ध पाणी देण्यास जिल्हा परिषद प्रशासन व सत्ताधारी कानाडोळा का करीत आहेत? असा प्रश्नही येथील नागरिक विचारत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details