महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोरबे धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू, मृतदेह शोधण्यास अपघातग्रस्त टीमला यश - मोरबे धरण

खालापुर तालुक्यातील चौक येथे वर्षाला सहलीसाठी लोक येत असतात. तसेच, पाऊसकाळ्याचा आनंद घेण्यासाठी काही तरुण मोरबे धरणावर आले होते. मात्र एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो मोरबे धरणात बुडाला.

मोरबे धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू
मोरबे धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू

By

Published : Jul 25, 2021, 8:57 PM IST

रायगड - खालापुर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना 24 जुलैला संध्याकाळी घडली होती. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये 25 जुलैला सकाळी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या टीमला यश आले आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडाला

मुंबई चेंबूरहुन वर्षाला सहलीसाठी लोक येत असतात. तसेच, पाऊसकाळ्याचा आनंद घेण्यासाठी काही तरुण मोरबे धरणावर आले होते. मात्र एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो मोरबे धरणात बुडाला.

मृतदेह बाहेर काढण्यात अपघातग्रस्त टीमला यश

24 जुलै संध्याकाळी अपघातग्रस्त टीमने त्याचा मृतदेहाचा शोध लावला. आज 25 जुलैला सकाळी त्याचा मृतदेह शोधण्यास अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या टीमला यश आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details