रायगड -अलिबाग तालुक्यातील रेवदंडा रस्त्यावरील आक्षी गावाजवळच्या पुलावरुन मंगेश झाडेकर (55, रा. रामनाथ) यांनी खाडीत उडी मारली. आजारपणाला कंटाळून त्यांनी पुलावरुन उडी मारल्याचे कारण समोर येत आहे. त्यांना शोधण्याचे काम पोलीस व स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.
अलिबागमध्ये आजाराला कंटाळून एकाची आक्षी पुलावरुन उडी - आक्षी पुल
मंगेश झाडेकर हे अलिबागमधील रामनाथ येथील रहिवासी आहेत. दारू व सिगारेटच्या व्यसनामुळे त्यांना आजाराने ग्रासले होते. आज दुपारी नागाव येथे मित्राकडे जात असल्याचे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. दुपारी दोनच्या सुमारास अलिबाग रेवदंडा रस्त्यावर असलेल्या आक्षी पुलावर येऊन त्यांनी खाडीत उडी मारली.
मंगेश झाडेकर हे अलिबागमधील रामनाथ येथील रहिवासी आहेत. दारू व सिगारेटच्या व्यसनामुळे त्यांना आजाराने ग्रासले होते. आठ दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. 22 जुलैला त्यांना उपचारानंतर सोडण्यात आले होते. आज दुपारी नागाव येथे मित्राकडे जात असल्याचे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. दुपारी दोनच्या सुमारास अलिबाग रेवदंडा रस्त्यावर असलेल्या आक्षी पुलावर येऊन त्यांनी खाडीत उडी मारली. पुलाशेजारी त्यांची काठी, चपला व पैशाचे पाकीट असा ऐवज सापडला आहे. पाकीटातील आधारकार्ड वरून त्याची ओळख पटली.
मंगेश झाडेकर यांनी पुलावरून उडी मारल्याची घटना कळाल्यानंतर अलिबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक व पोलीस यांच्या मदतीने मंगेश झाडेकर यांचा शोध सुरू आहे. मात्र, खाडीला भरती असल्याने शोध घेण्यात अडचण येत आहे.