महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किल्ले रायगड गडारोहण स्पर्धा.. अवघ्या ८ वर्षीय रणरागिणीने सर केला गड

दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगडावर गडारोहण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिजाऊंच्या जंयतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एका ८ वर्षीय रणरागिणीने किल्ले रायगड सर केला.

अवघ्या ८ वर्षीय रणरागिणीने सर केला गड
अवघ्या ८ वर्षीय रणरागिणीने सर केला गड

By

Published : Jan 13, 2020, 1:50 PM IST

Updated : Jan 13, 2020, 2:52 PM IST

रायगड- गुलामगिरीने पिचलेल्या जनतेला स्वराज्याची जाणीव करून देणाऱ्या जिजामाता या नवनिर्मितीच्या जनक होत्या. रविवारी १२ जानेवारी हा आऊसाहेब जिजाऊंचा जन्मदिवस, म्हणून रविवारी रायगड रोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. छत्रपती शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एका ८ वर्षीय रणरागिणीने अवघ्या ३४ मिनिटात रायगड सर केला आहे. पूजा तुकाराम सावंत असे त्या चिमुकलीचे नाव आहे.

किल्ले रायगड गडारोहण स्पर्धा.. अवघ्या ८ वर्षीय रणरागिणीने सर केला गड

रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील जिजामाता यांच्या समाधी स्थळाला वंदन करून रविवारी सकाळी ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत एकूण ५५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यापैकी ९ जण विजेते ठरले. परंतु महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेत आकर्षक ठरली ती महाड चांभारखिंड येथील पुजा सावंत. या मुलीने अवघ्या ३४ मिनिटात रायगड किल्ला सर केला. एवढ्या लहान वयात किल्ले रायगडसर केल्यामुळे संपुर्ण रायगड जिल्ह्यात आणि महाड नगरीत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Last Updated : Jan 13, 2020, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details