रायगड - ५५ वी किशोर, कुमार महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा १४ आणि १५ जानेवारी रोजी दोन दिवस अलिबाग क्रीडा भवन येथे होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यातून २४७ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. ही स्पर्धा चार गटात होणार आहे.
55 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा अलिबागमध्ये सुरू हेही वाचा -बांगलादेशच्या 'या' अष्टपैलू खेळाडूने रद्द केला संघासोबतचा करार
१२, १४, १९ आणि २१ वयोगटातील किशोर आणि कुमार मुले, मुली या गटात ही स्पर्धा होणार आहे. १४ जानेवारी रोजी १२ आणि १४ वयोगटातील तर १५ जानेवारी रोजी १९ आणि २१ वयोगटातील स्पर्धकांची कॅरम स्पर्धा होणार आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष गिरीश तुळपुके, अरुण केदार, सचिव यतीन ठाकूर, कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते, अभिजित तुळपुळे, कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी, पालक आणि स्पर्धक यावेळी उपस्थित होते.