महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 24, 2020, 7:13 PM IST

Updated : Aug 25, 2020, 2:22 PM IST

ETV Bharat / state

LIVE: महाड इमारत दुर्घटना : दोघांचा मृत्यू; अठरा तासांनंतर पहिला मृतदेह बाहेर काढण्यात यश

पडलेल्या इमारतीच्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारूक काझी आणि युनूस शेख अशी त्यांची नावं आहेत. अद्याप दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले असून पीडितांच्या दुखात सामील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आप्तस्वकीयांना गमावलेल्या कुटुंबीयांसोबत सरकार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.

महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली
महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली

रायगड- महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे 17 जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. इमारतीतील सर्व कुटुंब मुस्लीम धर्मीय होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे.

अठरा तासांनंतर पहिला मृतदेह बाहेर काढण्यात यश

LIVE UPDATES :

  • इमारतीच्या मलब्यातून अठरा तासानंतर पहिला मृतदेह बाहेर, एनडीआरफला यश
  • तपासपथके आरोपींच्या शोधासाठी रवाना - महाड पोलीस निरीक्षक शैलेश सणस
  • आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर गुन्हा दाखल
  • पीडित कुटुंबीयांच्या दु:खात सामील असून शक्य ते मदतकार्य त्वरित पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
    महाड इमारत दुर्घटना

अठरा तासांनंतर पहिला मृतदेह बाहेर, अद्याप 17 जण अडकले

तब्बल अठरा तासांनंतर पहिला मृतदेह काढण्यात एनडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. नाविक जावेद जोमाने (30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अद्याप 17 जणांचा शोध सुरू आहे. नाविक जोमाने याचे इमारतीत कार्यालय होते. दुपारी तो कार्यालयात झोपला होता. त्यानंतर ही घटना घडली. 18 तासानंतर त्याचा मृतदेह काढण्यात यश आले आहे. नाविक याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.

गृहमंत्री अमित शहांचे ट्वीट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबंधित दुर्घटनेसंदर्भात ट्वीट केले आहे. रायगडमध्ये इमारत कोसळणे ही अत्यंत शोकांतिक घटना असल्याने त्यांनी म्हटले आहे. एनडीआरएफच्या महासंचालकांशी बोलून सर्व माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. शक्य ती सर्व मदत देण्यासाठी पथके वाटेवर आहेत आणि शक्य तितक्या लवकर बचाव कार्यात त्यांना मदत केली जाईल, असे ते म्हणाले. शाह यांनी प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पडलेल्या इमारतीच्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारूक काझी आणि युनूस शेख अशी त्यांची नावं आहेत. अद्याप दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यासोबतच पोलिसांनी आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड तसेच अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

LIVE: महाड इमारत दुर्घटना : दोघांचा मृत्यू; आरोपींच्या शोधार्थ तपासपथके रवाना

एकाचा मृत्यू, सात जखमी तर 17 अडकले; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती..

महाड इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाला मुंबई येथे सैफी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफची तीन पथके दाखल झाली आहेत. तसेच, श्वानपथकाच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे.

तारिक गार्डन ही दोन विंगची इमारत असून, त्यात 41 फ्लॅट होते. त्यांपैकी 18 फ्लॅट हे रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये राहत असलेल्या ३८ नागरिकांपैकी 30 जण बाहेर पडले आहेत, तर 8 बेपत्ता आहेत. तसेच, बी विंग मधील 59 रहिवाशांपैकी 50 बाहेर पडले असून, 9 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत सुमारे 17 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

तसेच, या दुर्घटनेत मृत पावलेली व्यक्ती ही बाजूच्या इमारतीतील असून, तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

महाड इमारत दुर्घटना : एकाचा मृत्यू, सात जखमी तर २६ अडकले; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रेस्क्यू स्कॉड आणि श्वानपथकही घटनास्थळी दाखल; आमदार तटकरेंची माहिती

दुर्घटना झालेल्या इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही साधारण 150 जण अडकले आहेत. स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू स्कॉडच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यत आठ ते दहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच श्वानपथकही बोलविण्यात आले आहे. इमारतीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू झाले आहे अशी माहिती आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लहान मुलांसह महिला आणि पुरुष अडकले आहेत. यात काही जणांचा मृत्यूही झाल्याचे समजले आहे. मात्र, याबाबत अजून काही स्पष्टता प्रशासनाकडून मिळालेली नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णावाहिका दाखल झाल्या आहेत. एन.डी.आर.एफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, इमारत नक्की कशामुळे पडली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, इमारत हलत असल्याचे कळाल्यानंतर काही कुटुंबे इमारती बाहेर आली होती, अशी माहिती मिळाली आहे.

महाड इमारत दुर्घटना : दोघांचा मृत्यू, बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

दरम्यान, घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी व रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत चर्चा केली असून घटनास्थळी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले आहे.

Last Updated : Aug 25, 2020, 2:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details