रायगड - नरवीर तानाजी मालुसरे यांचा 350 वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा आज (सोमवारी) त्यांच्या उमरठ या गावी साजरा होणार आहे. यावेळी नरवीरांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या समाधी स्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
नरवीर तानाजी मालुसरेंचा 350 वी पुण्यतिथी सोहळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राहणार उपस्थिती - tanaji malusare death anniversary
नरवीर तानाजी मालुसरे यांचा 350 वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा आज (सोमवारी) त्यांच्या उमरठ या गावी साजरा होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातिथी सोहळ्याच्या निमित्ताने नरवीरांच्या उमरठ या गावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांचे समाधीस्थळ फुलांनी सजवण्यात आले आहे. उमरठ गावाला पर्यटन स्थळाचा 'क' दर्जा आहे. तो बदलून 'ब' दर्जा करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांची केली आहे. तर याबाबत मुख्यमंत्री ठाकरे काही घोषणा करतात का ? सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -'आज छत्रपतींची आठवण येते..! त्यांच्या काळातील कायदे आता लागू करण्याची गरज'