पनवेल- खारघरमधल्या पांडवकडा धबधबा येथे बंदीचे आदेश झुगारून गेलेल्या एकूण 29 पर्यटकांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. खारघरमधील पांडवकडा धबधबा हा अतिशय धोकादायक आहे. त्याठिकाणी गेल्या काही वर्षात आठ ते दहा पर्यटकांचा बुडून मृत्यू झालेला आहे.
बंदी आदेश झुगारुन पांडवकडा धबधबा बघण्यासाठी गेलेल्या 29 पर्यटकांना अटक - पांडवकडा धबधबा
यावर्षी पांडवकडा धबधबा येथे जाण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. परंतु बंदीचे आदेश झुगारून अनेक पर्यटक पांडवकडा या ठिकाणी जात होते. मागील आठवड्यात देखील पांडवकडा येथे 25 पर्यटक अडकले होते. तेव्हा खारघर पोलिसांनी जीव धोक्यात घालून त्यांची सुटका केली होती.
यावर्षी पांडवकडा धबधबा येथे जाण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. परंतु बंदीचे आदेश झुगारून अनेक पर्यटक पांडवकडा या ठिकाणी जात होते. मागील आठवड्यात देखील पांडवकडा येथे 25 पर्यटक अडकले होते. तेव्हा खारघर पोलिसांनी जीव धोक्यात घालून त्यांची सुटका केली होती. परंतु तरी सुद्धा पर्यटक सतत बंदी आदेश झुगारून पांडवकडा येथे जात असल्याने आज खारघर पोलिसांनी कठोर भूमिका घेत भारतीय दंडविधान संहिता कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करून 29 पर्यटकांना अटक केली आहे.
पर्यटकांनी धोकादायक पांडवकडा धबधबा येथे जाऊ नये, असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.