रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर एस टी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एसटी पुलावरुन कोसळली असून,२० प्रवासी जखमी झाले आहेत. तर २ जण गंभीर आहेत. जखमींना माणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माणगाव नजीक कळमजे पुलावर पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात घडला. याएसटी बसमध्ये ४४ प्रवासी होते. यातील २० प्रवासी जखमी झाले असून, दोघांची परिस्थिती गंभीर आहे. एसटी चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर एस टी बस पुलावरुन कोसळली मुंबई आगारातून रातराणी (एमएच 14/ बीटी 0143) एसटी बस दापोलीकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. एसटी बस ही पहाटे पाच ते साडेपाच दरम्यान माणगाव नजीक असलेल्या कळमजे पुलावर आली असता चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. अपघातांनातर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मुंबई-गोवा महामार्गावर एस टी बस पुलावरुन कोसळली सुदैवाने एसटी बस ही नदी पात्रात पडली नाही, अन्यथा प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका झाला असता. काही दिवसांपासून एसटी बसमधील अपघाताच्या प्रमाणात मात्र वाढ होताना दिसत आहे.