महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CCTV : कामोठेत भरधाव कारने दोघांना चिरडले.. आठ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर - कारचालक

पनवेल येथील कामोठेत भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे

कामोठेत भरधाव वेगाने आलेल्या कारने दोघांना चिरडले (संग्रहीत).

By

Published : Jul 22, 2019, 12:57 PM IST

Updated : Jul 22, 2019, 2:43 PM IST

पनवेल - येथील कामोठेत भरधाव वेगात आलेल्या कारच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात सात ते आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कामोठेत भरधाव कारने दोघांना चिरडले.. आठ जण जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

कामोठ्यातील सेक्टर सहामधील एका गजबजलेल्या रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या एका स्कोडा कारने समोरून येणाऱ्या बाईक व स्कूल बसला धडक दिली. या धडकेत एक महिला व पुरुष रस्त्यावरच बेशुद्ध पडले. तर, एक दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. अन्य काही जणांनाही गाडीने धडक दिली. त्यात ते जखमी झाले. जखमींना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार चालकाने पहिल्यांदा डाव्या बाजुच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर विरुध्द दिशेला वाहन नेत रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर थेट वाहन घातले. या कारने एकूण चार दुचाकींना उडवत धडक दिली. यामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसचाही समावेश आहे. या घटनेत पादचारी सार्थक चोपडे (वय ७) आणि वैभव गुरव (वय ३२) या दोघांचा मृत्यू झाला. तर मृत सार्थक चोपडेची आई साधना चोपडे (वय ३०), श्रध्दा जाधव (वय ३१), शिफा (वय 16) (पुर्ण नाव समजू शकले नाही), आशिष पाटील (22) आणि प्रशांत माने हे पाच जण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर कार चालकाने पळ काढला आहे. या घटनेसंदर्भात कामोठे पोलिसांनी अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Jul 22, 2019, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details