रायगड -मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या विचित्र अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत. खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली. त्यापाठोपाठ आणखी 2 वाहने येऊन धडकली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू - मुंबई पुणे एक्स्प्रेस वे अपघात
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू
महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू केले आहे. लॉकडाऊनमुळे या मार्गावरील वर्दळ खूप कमी झाली होती. त्यामुळे अपघाताच्या घटना जवळपास थांबल्या होत्या. मात्र, दुर्दैवाने आज हा भीषण अपघात झाला आहे.
Last Updated : Jun 29, 2020, 10:59 AM IST