महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातून ओडिशा राज्यातील 154 जण निघाले आपल्या गावी - raigad corona update

रायगड जिल्ह्यात परराज्यातील हजारो नागरिक हे कामानिमित्त वर्षोनुवर्षे राहत आहेत. हे परराज्यातील नागरिक बांधकाम क्षेत्रात तसेच जिल्ह्यातील एमआयडीसी, बोटीवर काम करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन जाहीर झाला असल्याने हे सर्व नागरिक जिल्ह्यात अडकून पडले आहेत.

raigad corona update
रायगड जिल्ह्यातून ओडिशा राज्यातील 154 जण निघाले आपल्या गावी

By

Published : May 7, 2020, 4:37 PM IST

रायगड - कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व कामधंदा, वाहतूक सेवाही बंद झाल्याने परराज्यातील हजारो नागरिक हे ठिकठिकाणी अडकून पडले. रायगड जिल्ह्यातही कामानिमित्त आलेले हजारो परराज्यातील नागरिक हे अडकले आहेत. या अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना त्याच्या गावी पोहोचविण्यासाठी शासन आणि प्रशासनाने आता पावले उचलली आहेत. अलिबाग, मुरुड तालुक्यातून ओडिशा राज्यातील 154 नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनामार्फत आज त्याच्या गावी पाठविले आहे. यावेळी या नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

154 people from Odisha state left Raigad district for their village
रायगड जिल्ह्यात परराज्यातील हजारो नागरिक हे कामानिमित्त वर्षोनुवर्षे राहत आहेत. हे परराज्यातील नागरिक बांधकाम क्षेत्रात तसेच जिल्ह्यातील एमआयडीसी, बोटीवर काम करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन जाहीर झाला असल्याने हे सर्व नागरिक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. शासनाने अशा अडकलेल्या नागरिकांना त्याच्या मूळ गावी पाठविण्याची सुविधा जिल्हा प्रशासनामार्फत केली आहे.

अलिबाग, मुरुड तालुक्यातील अडकलेल्या 154 जणांना आज अलिबाग येथून सहा एसटी बसने पनवेल येथे सोडण्यात आले असून तेथून ते विशेष रेल्वेने ओडिसाकडे रवाना होणार आहेत. या सर्वांना निर्जंतुकीकरण केलेल्या एसटी बसेसमध्ये खाण्याचे पाकीट, पाणी, मेडिकल तपासणी करून ओडिशाकडे रवाना केले. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, अलिबाग आगर प्रमुख, महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details