महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांच्या भविष्याला नगरपंचायतीचे ग्रहण ; म्हसळा तालुक्यातील 'ती' मराठी शाळा होणार जमीनदोस्त - सुनील अंजार्लेकर

राज्य सरकार सर्व शाळांमध्ये मराठी सक्ती करण्याच्या तयारीत आहे. असे असले तरी म्हसळा शहरातील १४५ वर्ष जुन्या मराठी शाळेला नगरपंचायतीचे ग्रहण लागल्याने आता अनेकांच्या आठवणीतील ही शाळा जमीनदोस्त होणार आहे. ही शाळा तोडून नगरपंचायत इमारत बनवण्यासाठीचा ठराव रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

Mhasala city in Raigad district
जिल्हा परिषद शाळा म्हसळा

By

Published : Feb 14, 2020, 2:55 AM IST

रायगड - म्हसळा शहरातील नगरसेवकांसाठी सध्या असणारे नगरपंचायत कार्यालय अपुरे पडत आहे. त्यामुळे या नगरसेवकांना बसण्यासाठी, या शाळेची जागा वापराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. देशाचे भविष्य असणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काडण्याचा हा डाव चुकीचा असल्याचे नागरिक सांगत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक १२(१६) मध्ये ९ गुंठ्यात गावठाण क्रं. १/१८७ या शहरातील मध्यवर्ती नवाब कालीन शाळा पाडून नगरपंचायत इमारत बांधण्यासाठी, ना हरकत दाखला देण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा...शिदोरीत तर वस्तुस्थिती, भाजपकडून सावरकरांचा मिठाच्या खड्यासारखा वापर

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात मराठी भाषा टिकावी, म्हणून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यात येत आहे. मात्र, मराठी भाषा शाळाच हद्दपार व्हावी यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रयत्न करत असल्याचा आरोप तालुक्यातील पालकवर्ग करत आहे. जिल्ह्यातील म्हसळा शहरातून चक्क १४५ वर्ष जुनी सध्यास्थित १५९ पट असणारी नवाब कालीन मराठी शाळा काही राजकीय लोकप्रतिंनिधी आपल्या फायद्यासाठी हद्दपार करत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष सुनील अंजार्लेकर यांनी केला आहे.

म्हसळा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये तालुक्यातील इतर मराठी शाळा बंद झाल्यामुळे त्या गावातीलही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. 'आमची मराठी भाषा टिकावी, आमची मराठी शाळा वाचावी, यासाठी आम्ही ही शाळा तोडून देणार नाही. शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू' असे सुनील अंजार्लेकर यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details