रायगड - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण संख्याही वाढू लागली आहे. असे असले तरी बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. कोरोना बाधीत रुग्णांना बेडची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जिकल विभागात 100 बेडचे अद्यावत असे जिल्हा कोविड सेंटर तयार करण्यात येत आहे. 40 बेड हे ऑक्सिजन यंत्रणेने तर 60 बेडला व्हेंटीलेटर, ऑक्सिजनयुक्त बनविण्यात आलेले आहे. सीएसआर फंडातून जिल्हा सामान्य रुग्णालयातच हे जिल्हा कोविड सेंटर बनविण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना बाधीत रुग्ण संख्येचा मुकाबला करण्यासाठी या कोविड सेंटरचा फायदा होणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनसाहित 100 बेडचे काम सुरू - रायगड कोरोना बातम्या
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्याही 26 हजार पार झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे यापैकी 23 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 4 हजार जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर आतापर्यत 800 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोविड सेंटर
रायगडातील कोविड सेंटर