महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महावितरणच्या विद्युत वाहिनीवर तरुणांचे धोकादायक काम

पुणे-नाशिक महामार्गावर महावितरणच्या मुख्य लाईनचे काम सुरू असताना ३ तरुण लोखंडी पोलवर चढून धोकादायक पद्धतीने काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे-नाशिक हायवे

By

Published : Feb 13, 2019, 11:39 PM IST

पुणे - पोटाची खळगी भरण्यासाठी कामाची गरज असते. मात्र, हेच काम आपल्या जीवावर बेतणार असेल तर अशा कामाचा उपयोग काय ? हा प्रश्न आहेच. पुणे-नाशिक महामार्गावर महावितरणच्या मुख्य लाईनचे काम सुरू असताना ३ तरुण लोखंडी पोलवर चढून धोकादायक पद्धतीने काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

धोकादायक पद्धतीने काम करताना तरुण

चाकण ते राजगुरुनगर दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरून महावितरणच्या मुख्य लाईनचे काम सुरू आहे. यामध्ये ३ तरुण भर उन्हामध्ये पोलच्या वरच्या भागात काम करत होते. परंतु, यावेळी त्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास महावितरणकडून पर्यायी व्यवस्था केलेली पाहायला मिळाली नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या विद्युत लाईन आणि रोहित्र यावर शॉक लागून मृत अथवा जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशी धोकादायक प्रकारची कामे करत असताना महावितरणकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था ठेवली जात नाही. याकडे ना ठेकेदारांचे लक्ष असते ना महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात.

ABOUT THE AUTHOR

...view details