महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून मित्राची हत्या, गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे मित्र आहेत. ते नऱ्हे येथील अभिनव महाविद्यालयाजवळील एका मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. दोघेही गवंडी काम करतात. सोमवारी रात्री या दोघांमध्ये बाहेरुन भाजी आणण्यावरुन वाद झाला.

मृत तरुण

By

Published : Feb 5, 2019, 6:22 PM IST

पुणे - किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून मित्राची हत्या केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला. किरण काटकर (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे मित्र आहेत. ते नऱ्हे येथील अभिनव महाविद्यालया जवळील एका मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. दोघेही गवंडी काम करतात. सोमवारी रात्री या दोघांमध्ये बाहेरून भाजी आणण्यावरून वाद झाला. या वादातूनच पप्पू पाटील यांनी पहाटेच्या सुमारास किरणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी किरण काटकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांचे एक पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details