पुणे - राजगुरूनर पाबळ रस्त्यावर होलेवाडी येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष झांबर मुळूक (वय ३०, रा. बिबी ता. खेड) असे मृत तरूणाचे नाव आहे.
राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर बस व दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर होलेवाडी येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये संतोष मुळूक या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीस्वार जागीच ठार
मागील २४ तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असताना रस्त्यांवर अपघातांच्या घटनाही घडत आहेत. तर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर होलेवाडी येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये संतोष मुळूक या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
सध्या पाऊसाच्या दिवसांवर रस्ते निसरडे झाल्याने अपघातांचा मोठा धोका असतो. त्यामुळे वाहन चालविताना धोकादायक ठिकाणी वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.