महाराष्ट्र

maharashtra

मोदी सरकार विरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

By

Published : Feb 3, 2021, 10:24 PM IST

केंद्रीय अर्थसंकल्पात तरुणांसाठी काहीच तरतूद केली नसल्याचे आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात गाजर वाटप करण्यात आले.

काँग्रेस बातमी
काँग्रेस बातमी

पुणे -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरुणांसाठी कोणतीही तरतूद नसल्याचा आरोप करत बुधवारी (दि. 3 फेब्रु.) युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यातील शारदा गणपती मंदिर येथी मोदी सरकारला सद्बुद्धी द्या, अशी प्रार्थना केली. तसेच प्रसाद म्हणून गाजरचे वाटप केले, अशी माहिती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांनी दिली

बोलताना युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष

अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून तरुणांसाठी एकही तरतूद करण्यात आलेली नाही. देशात मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार होत असतानाही मोदी सरकार तरुणांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांना केवळ दीडपट हमीभावाची घोषणा केली व तरुणांसाठी कशाचीही तरतूद केली नाही. केंद्र सरकारकडून शेतकरी व तरुणांना गाजर दाखवण्यात आल्याचे म्हणत कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर प्रसाद म्हणून गाजरचे वाटप केले.

हेही वाचा -बैलगाडीचा कासरा हातात घेऊन अमित ठाकरेंनी दिला शेतकरी संदेश..!

ABOUT THE AUTHOR

...view details