बारामती पुणे व्याजाने घेतलेल्या पैशाला कंटाळून इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जावेद अब्बास मुलाणी असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नवाज अब्बास मुलाणी वय 40 वर्षे राहणार भरणेवाडी ता इंदापूर यांच्या तक्रारीवरून प्रफुल्ल रघुनाथ देवकाते रा. पिंपळी ता बारामती जि. पुणे, विजय मोटे रा. निरावागज ता बारामती जिल्हा पुणे, संदिप अरुण भोसले रा.निमसाखर ता . इंदापुर यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीत सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या - बारामतीत सावकाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या
जावेद मुलानी यांनी 23 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावच्या हद्दीतील जंक्शन कळस रोड येथील एका शेतकऱ्याच्या विहिरी शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला गळफास घेतला. व्याजाचा पैशावरून वरील तिघे जीवे मारण्याची धमकी देऊन सतत त्रास देत असल्याची चिठ्ठी मयताच्या खिशात आढळून आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई खंदारे करीत आहेत.
चिठ्ठी मयताच्या खिशात आढळली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जावेद अब्बास मुलाणी यांनी प्रफुल्ल देवकाते, विजय मोटे, संदीप भोसले यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाच्या पैशावरून वरील तिघांकडून जावेद मुलानी यास सतत त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जावेद मुलानी यांनी 23 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावच्या हद्दीतील जंक्शन कळस रोड येथील एका शेतकऱ्याच्या विहिरी शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला गळफास घेतला. व्याजाचा पैशावरून वरील तिघे जीवे मारण्याची धमकी देऊन सतत त्रास देत असल्याची चिठ्ठी मयताच्या खिशात आढळून आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई खंदारे करीत आहेत.