पुणे - आज महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर येथे तरुण-तरुणी नागफणी पॉईंटवरून खोल दरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांकडून या दोघांचे शोध कार्य सुरू आहे. मात्र, नागफणी हा पॉईँट खोल दरीचा असल्याने या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेऊन शोधकार्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महाशिवरात्रीदिवशीच भीमाशंकरच्या नागफणी पॉईंटवरून तरुण-तरुणी पडले खोल दरीत
आज महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हा संपूर्ण परिसर डोंगराळ जंगल परिसर आहे. या परिसरात वर्षभर पर्यटनाची ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक येतात. मात्र, वनविभागाच्या विशेष सुचनांकडे पर्यटक नेहमीच दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

हे तरुण-तरुणी महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकराच्या दर्शनाला आले होते. दर्शनानंतर ते भीमाशंकर जवळच असणाऱ्या डोंगरकड्यावरील नागफणी पॉईंटला गेले. त्यावेळी ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घडलेल्या घटनेची माहिती एका व्यक्तीने कंट्रोलरुमला दिल्यानंतर नागफनी पॉईंटवर शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही तरुण-तरुणी कोण आहेत याची माहिती मिळु शकलेली नाही.