पुणे -सिंहगड महाविद्यालय परिसरात एका 25 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह जाळण्यात आला. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सिंहगड महाविद्यालय परिसरातील टेकडीवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, असता संपूर्ण जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. मृतदेहाचा चेहरा खराब झाल्याने मृताची ओळख पटू शकली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांनी दिली.