बारामती (पुणे) - शहरातील कसबा परिसरातील कऱ्हा नदीच्या पात्रामध्ये आज (रविवारी) एका माथेफिरुने 70 वर्षीय ज्येष्ठाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. सोपान सावळाराम जगताप (वय ७०, रा. संत सेना महाराज नगर,कसबा) या व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गणेश मारुती कुंभार (वय-३२) या माथेफिरुला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील अप्पासाहेब पवार मार्गावरून कऱ्हा नदीच्या जुन्या पुलावरून जगताप हे कसब्यातील मशिदीच्या बाजूकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कुंभार याने त्यांना नदी पात्रात ढकलून देत तेथे पडलेला एक दगड उचलून जगताप यांच्या डोक्यात घातला. ही घटना परिसरातील काहिनी पाहताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत जगताप यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
बारामतीच्या कऱ्हा नदी पात्रात माथेफिरूने 70 वर्षीय ज्येष्ठाचा केला खून - baramati crime
शहरातील कसबा परिसरातील कऱ्हा नदीच्या पात्रामध्ये आज (रविवारी) एका माथेफिरुने 70 वर्षीय ज्येष्ठाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली.
बारामतीच्या कऱ्हा नदी पात्रात माथेफिरूने 70 वर्षीय ज्येष्ठाचा केला खून
घटनेनंतर लागलीच पोलिसांनी कुंभार याला ताब्यात घेतले. गेल्या काही महिन्यांपासून त्याने कसबा भागात अनेकांना त्रास दिला आहे. रात्रीच्या अंधारात दबा धरुन हल्ला करणे, दगड भिरकावणे अशी कृत्ये त्याने यापूर्वीही केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.