महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकतर्फी प्रेमातून गोळीबार करून आत्महत्येच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक - sp

पोलीस भरती प्रशिक्षणात एकत्र शिक्षण घेत असताना एकतर्फी प्रेमातून अक्षय दंडवते या तरुणाने पीडित मुलीवर पिस्तुलातून गोळीबार करून तिला धमकावत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

pune
एकतर्फी प्रेमातून तरुणीसमोर गोळीबार; आत्महत्येच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

By

Published : Mar 2, 2020, 8:40 PM IST

पुणे - एकतर्फी प्रेमातून तरुणीसमोर गोळीबार करून आत्महत्येच्या तयारीत असताना पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. पोलीस भरती प्रशिक्षणात एकत्र शिक्षण घेत असताना एकतर्फी प्रेमातून अक्षय दंडवते या तरुणाने पीडित मुलीवर पिस्तुलातून गोळीबार करून तिला धमकावत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने स्वत आत्महत्या करण्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील

दरम्यान, त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी व अक्षय दंडवते हे दोघे शाळा, महाविद्यालयीन शिक्षण त्यानंतर पोलीस भरती प्रशिक्षणात एकत्र शिक्षण घेत होते. त्यावेळी एकतर्फी प्रेमाच्या मानसिक विकृतीत अक्षय या तरुणाने रविवारी सायंकाळच्या सुमारास तरुणीला धमकावून जिवे मारण्याच्या हेतुने तिच्यावर गोळीबार केला. त्यानंतर स्वत आत्महत्या करणार असल्याचे स्टँम पेपरवर लिहून ठेवले. मात्र ही दुर्घटना घडण्याआधीच नारायणगाव पोलिसांनी तरुणाला अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

यासंदर्भातली सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा -

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा हवेत गोळीबार.. तरुणीला धमकावण्याचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details